कुसुंबी माईन्स मध्ये आदिवासींची शेती बहरली ७/१२ मध्ये पेरे नोंदवा तहसिलदाराकडे मागणी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील वादग्रस्त आदीवासी कुटुबाच्या शेत जमीन मानीकगड सिमेंट कंपनीने जमीन नष्ट करुण कब्जा करूण चुनखड़ी उत्खनन केल्याच्या १४ कुंटूबाने पोलीस व महसुल प्रशासना कडे तक्रारी दाखल करूण न्याय मागण्याचा सतत प्रयत्न केला उघड्यावर पडलेल्या या आदीवासी ने माईन्स परिसरातील ८ ९ हेक्टर जमीन कसत नागरणी वखरनी करूण तिन वर्षा पासुन कापुस तुर ज्वारी धान पेरणी करीत उत्पादन घेत माईन्स क्षेत्रात उत्पादन घेत माईन्सलगत लोकवस्ती वास्तव्य करूण नियम बहाय १४ कुंटुबाना ७/१२ व मालकी हक्क असताना २०१३ मध्ये तहसिलदार मंडल अधिकारी कंपनीच्या आहारी जाऊन इतर अधिकारात मानीकगड खदान असा उल्लेख करूण आदिवासीना बेदखल करण्याचा आदेश व चुकीच्या नोंदी घेतल्या हा वाद नागपुर खंडपिठात सुरु आहे असे असताना कंपनी बेकायदेशीर रस्ता अडविने नियम बाहय वन क्षेत्रात सायलो हापरचे बांधकाम रस्त्या लगत केल्याने ८ते १० गावाच्या नागरीकाना डोके दुखी झाली निष्पाप आदीवासी वर गुन्हे दाखल करुण त्रासदिल्या जात आहे या वर्षी पिक जोमदार आले आमच्या जमीन आम्ही कस्त आहो चौथ्या टप्पा खदानी साठी लिगंनडोह कुसुंबी येथिल शेतकऱ्यानी जमीन देण्यास नकार दिला असून जिल्हाधिकारी यांचेकडे आक्षेप दाखल करूण वन व्यवस्थापन समीती ग्रामसभा व ग्राम पंचायत ठराव दिशाभुल करणारा व नागरी का चा विश्वासघात करणारा व संशयीत बनावटी असल्याचा आरोप करीत तहसिलदार यांचे कडे वाहीवाट रस्ता व शेतात उभ्या पिका चे मौका पाहणी करुण ७/१२ वर पेरे पत्रकात नोंद घेण्याची मागणी जनसत्याग्रह संघटनेचे स आबिद अली संभु आत्राम अरुण उद्दे भावराव कन्नाके पुष्पा मंगाम महादेव कुड मेथे यांनी केली आहे.