चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा पुढाकार.
Bhairav Diwase. Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील लाडज येथे पुराचे पाणी आल्याने संपूर्ण गावात पुराचे पाणी वाहत आहे त्यामुळे संपूर्ण गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने लाडज येथील संपूर्ण नागरीकांना सावंगी येथे हलविले व त्यांची तेथिल जिल्हा परिषद शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली.
सावंगी येथे असलेल्या नागरिकांची आमदार बंटीभाऊ यांनी भोजन व्यवस्था केली असून त्यांचे पर्यंत मसाला भात पोहोचविला पूरपरिस्थिती नियंत्रण व सुरक्षितता पोहोचविणाऱ्या एन.डी.आर.एफ.जवानांना सुद्धा भर पाण्यारून वाहन नेऊन भोजन व्यवस्था करून देण्यात आली.समस्त नागरिकांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे आभार व्यक्त केले.यावेळी सचिन आकुलवार, गिरीश वानखेडे व त्यांच्या चमूने सहकार्य केले.