Bhairav Diwase. Sep 01, 2020
पोंभुर्णा:- गोसेखुर्द धरणांचे पाणी सोडल्याने पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावात पुर परीस्थीती निर्माण झाली आहे.त्यात जुनगाव, गंगापुर टोक, देवाडा, पिपरी देशपांडे, घाटकुळ,व नदीकाठावरील सर्व गावात पुराने थैमान घातले आहे.यात त्या परीसरातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पुर्णतः उध्वस्थ झाली आहे.या शेतीचा त्वरीत पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन गोरंटिवार यांनी केली आहे.
पावसाने गोसेखुर्द धरणांचे पाणी वाढले आहे त्यात तेथील पाणी सोडण्याने यंदा पोंभुर्णा तालुक्यातील नदिकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांचे पिके हे पुर्णतः उध्वस्थ झाले आहेत.आधीच कोरोणाच संकटातून शेतकरी सावरताना दिसतोय तर पुन्हा त्यांच्यापुढे पुराचे संकट उभे राहिले आहे.या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने त्या सर्व शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार यांनी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकाव्दारे केली आहे.