पाथरी पोलिसांनी 5 महिला शेतमजुरांना दिले जीवदान.
Bhairav Diwase. Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- मागील तीन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात येत असल्याने आणि गोसीखुर्द धरण ओव्हरलोड झाल्याने 33 दरवाजे उघडण्यात आले आहे. यापैकी 26 वक्रदार साडेतीन मीटरने तर 7 वक्रदार चार मीटरने उघडल्यात आले असून गोसेखुर्द प्रकल्पातून 23,241 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे . गोसेखुर्दचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढ झाल्याने वैनगंगा नदीतून पाण्याचा विसर्ग होत आहे.
सावली तालुक्यातील करोली, आकापुर ,बोरमळा, गेवरा,डोंगरगाव, निफंद्रा, विहिरगाव, निमगाव, चीचबोडी, दाबगाव, थेरगाव, व्याहाड, वाघोली, सामदा, सोनापूर, निलसनी पेडगाव,हरंम्बा, डोनाळा ,कडोली, लोंढोली, साखरी, शिरशी, जिबगाव, उसेगाव ,रुद्रापूर ,कवटी, पारडी,हरणघाट ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर आहे. नदीला पूर आल्याने तालुक्यातील अनेक गावे प्रभावित झालेली आहेत सावली मुख्यालयाला जोडणारे मार्ग बंद झाली आहेत. पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झालेली आहे सावली ते हंराबा,व्याहाड ते सावली ब्रह्मपुरी मार्ग बंद झालेले आहेत. तर तालुक्यातील बोरमळा या गावाला पुराने वेढले आहे .
*पाथरी पोलीस अंतर्गत असलेल्या बोरमळा गावी गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातून पाणी गावापर्यंत घुसले असून पुराचे पाण्यामध्ये पाच महिला सकाळी पहाटे सहा वाजता चे दरम्यान ने शेतावर निंदण्याकरिता गेल्या असताना अडकून पडलेल्या आहेत .अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पाथरीचे पी आय श्री. योगेश घारे तात्काळ पथक घेऊन बोरमळा गावातील सरपंच व दोन स्थानिक मच्छीमार यांचेसह रेस्क्यू ऑपरेशन राबवले .स्थानिक मच्छीमारांकडुन एका छोट्या नावाची व्यवस्था करून सदर महिलांना टप्प्याटप्प्याने पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले व सदर पाचही महिलांना सुखरूप त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. कोणीही ग्रामस्थ नदीपात्रात प्रवेश करणार नाही अशा सूचना देऊन योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.*
गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून आदी लगतचा गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात येत आहेत . जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. असता पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्याचे कार्य नसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकद्वारे सुरू आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी हे पथक आज रोजी सोमवारी दाखल होणार आहे. पालकमंत्र्यांनी तालुका स्थळावर आढावा सभा तातडीने आयोजन करून अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे