Click Here...👇👇👇

दारूबंदी बाबत 2 सप्टेंबरला बैठक.

Bhairav Diwase

गृह मंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची राहणार उपस्थिती.


दारूबंदी हटण्याबाबत मद्यप्रेमींची उत्सुकता शिगेला.

Bhairav Diwase. Sep 01, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर

चंद्रपूर:- चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी बाबत निर्णय घेण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 रोजी राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयात दुपारी 1 वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीला गृह मंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त तसेच या विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान या बैठकीत काय निर्णय घेतल्या जाईल याकडे दोन्ही जिल्ह्यातील मद्यप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.