पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालय इमारतीत कोविड टेस्‍टींगसाठी रेफ्रिजरेटर व एअरकंडीशनर उपलब्‍ध.

Bhairav Diwase
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सात दिवसाच्‍या आत केली मागणी पूर्ण.
 Bhairav Diwase.    Sep 03, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालयात कोविड चाचणीसाठी एक रेफ्रिजरेटर व एक एअरकंडीशनर तातडीने उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. दिनांक 1 ऑगस्‍ट रोजी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष तथा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सदर रेफ्रिजरेटर व एअरकंडीशनर चे लोकार्पण करण्‍यात आले आहे.

पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम यांनी ग्रामीण रूग्‍णालय पोंभुर्णा येथील इमारतीत कोविड टेस्‍टींगसाठी एक रेफिजरेटर व एअरकंडीशनर उपलब्‍ध करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे आठवडाभरापूर्वी केली होती. आ. मुनगंटीवार यांनी सदर मागणीला तात्‍काळ प्रतिसाद देत सात दिवसाच्‍या आत आमदार निधीतुन ही मागणी पूर्ण केली. आ. मुनगंटीवार यांनी सदर मागणी तात्‍काळ पूर्ण केल्‍याबद्दल जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समितीच्‍या उपसभापती ज्‍योती बुरांडे, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.