माजरी येथील युवकाचा घातपात की दारूमुळे मृत्यू?

Bhairav Diwase
भद्रावती तालुक्यातील घटना.
Bhairav Diwase.    Sep 04, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
भद्रावती:- वरोरा येथील स्थानिक माजरी वस्ती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक ६ येथील रहिवाशी अतुल दिलीप मोहितकर (२५) हा तरुण दिनांक २/९/२०२० रोजी पासून घरून दुपारी ३ वा. दरम्यान निघून गेल्याचे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे. परंतु प्राथमिक व गुप्त माहितीच्या आधारे हा तरुण शेतकरी आहे. व दारू पिण्याच्या सवयी चा होता. परंतु जास्त वेसनाधीन नव्हता दरम्यान  ह्या घरून गेलेल्या तरुणाचा नातेवाईकानी जवळपास शोध घेतला. दोन दिवस घरी न परतल्याने त्यांच्या घरच्यांनी परत पुन्हा त्याचा शोध सुरू केला असता. ४ सप्टेंबरला त्यांच्याच घराजवळील थोड्या अंतरावर असणाऱ्या महादेव मंदिर परिसरातील चिंचेच्या झाडाखाली मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान या  घटनेची माहिती होताच मृतक युवकाच्या भावाने व वडीलाने माजरी पोलीस स्टेशन ला माहिती दिली. दरम्यान माजरी पोलीस स्टेशन चे पो.कॉ. रवी गीते व पो. शंकर मत्ते यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविला. पंचनामादरम्यान मृत युवकाच्या अंगावर घाव हे जबर मारहाणीचा प्रयत्न करत केले असावे व दारू पितांना त्याच्या सोबत कुणीतरी जवळीक मित्र असेल असा प्राथमिक अंदाज लावल्या जात आहे. त्यामुळे या तरुणाचा मृत्यू हा अति दारू पिण्यामुळे झाला की कुणी मारहाण केल्यामुळे झाला हे गूढ अजून कायम आहे! की याप्रकरणी या तरुणाला कुणी मारहाण करून घातपात घडवून आणला आहे असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांना वाटत आहे. मात्र या तरुणाच्या मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे ! याबाबत माजरी पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांना विचारणा केली असता. युवकाची वैधकीय चाचणी   अहवाल आल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही असे सांगितले. परंतु माजरी परिसरात ह्या मृत्यूचे कारण नक्की घातपात असू शकते अशी दबक्या आवाजात नागरिकांची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान घटनेचा तपास माजरी पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस करीत आहेत.