Bhairav Diwase. Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- कापसी येथील संस्कार या 10 वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वनविभाग मार्फत कुटुंबियांना 4 लक्ष 75 हजार रुपयांची मदत पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे हस्ते वाटप करण्यात आली.
सावली तालुक्यातील व्याहाड बुज ते कापसी मार्गावर सकाळी व्यायामासाठी गेलेल्या कापसी येथील संस्कार सतीश बुरले (१०) या बालकाला बिबटयानी अचानक हल्ला करून उचलून नेले. शोध केले असता त्या बालकाचा मृतदेह मिळाला. वनविभागाची मदत निधी 15 लक्ष रुपयांची आहे. घटनेच्या दिवशी वनविभागाचे वतीने तात्काळ 25 हजार रुपयांची मदत कुटुंबियांना केली होती. मदतीची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते तहसिल कार्यालयात संस्कारचे कुटुंबियांना 4 लक्ष 75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तहसीलदार परीक्षित पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी, विजय मुत्यालवार, प्रफुल बोमनवार, नितीन दुवावार, भाऊराव कोठारे, स्वप्नील संतोषवार मृतकाची आई, वडील व भाऊ उपस्थित होते.