Bhairav Diwase. Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आज रुग्णांना बेड मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. यातच आता खाजगी रुग्णालयात तर चक्क दीड लाख जमा करा व कोरोना बाधितांवर उपचार करा असा फतवाचं काढला आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर मात्र मनुष्यबळ नसल्याचे कारण देत आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन साधने घेण्यासाठी पैसे लागतात व हे दर आम्ही न लावले असून शासनाकडून खाजगी रूग्णालयासाठी लावण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता त्यावेळी प्रशासनाने उचित नियोजन केले असते तर आज ही वेळ आली नसती. शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नाही तर परिवारातील कुणालाही कोरोनाची बाधा झाली तर त्यावर उपचार चांगल्या पद्धतीने व्हायला हवे असे कुणालाही वाटतेच. पण या उदभवलेल्या परिस्थितीचं जबाबदार कोण आहे याचा आपण कधी विचार करतच नाही. शासनाने आधी यावर नियोजन केले असते तर आज जिल्ह्यातील नागरिकांना बेडसाठी वणवण फिरावे लागले नसते. जिल्ह्यात खाजगी होस्टेलचे प्रमाण जास्त आहे शासनाने ते ताब्यात घेत त्या ठिकाणी रुग्णाची व्यवस्था होऊ शकते . कोरोना हा घरी राहून बरा होऊ शकतो असे प्रशासन वारंवार सांगत आहे तर खाजगी रुग्णालयात उपचार कशाला घ्यायचा, खाजगी रुग्णालयात उपचार म्हणजे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्रीच म्हणावी लागेल.