Bhairav Diwase. Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील सरपंच सम्राट तथा ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पाच वर्षांचा कालावधी पुर्ण केल्याने त्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन कोहचाळे, तर प्रमुख अतिथी म्हणून एच.एस.बांगरे ग्रामसेवक, प्रकाश काळे प्रशासकीय अधिकारी, दशरथ फरकाडे सरपंच, लता दुधकोचर उपसरपंच, भास्कर चोखारे सदस्य, प्रविण लडके, मिनाक्षी पिंपळशेंडे, छाया हेपट सर्व ग्रामपंचायत सदस्य महादेव अडबाले शाळा व्यवस्थापन समिती, हरेश्र्वर हेपट, शिक्षक तथा गावातिल नागरीक उपस्थित होते.
चेक बल्लारपूर येथील सरपंच दशरथ फरकाडे हे सरपंच सम्राट म्हणुन गौरविण्यात आलेले विदर्भातील पहिले सरपंच आहेत त्यांनी गावविकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य पाहुन त्यांना ही पदवी बहाल केली.
वृक्षारोपण मोहिम,ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, गावातील नागरिकांना मच्छरदाणी वाटप, वाटर कॅन वाटप, प्रत्येक घरात डस्टबिन, कोरोना महामारी ची खबरदारी घेण्यासाठी ग्राम पंचायत ला सॅनिटायझर मशीन, पिण्याचे पाणी, क्रीडांगण, जनावरांना पिण्याचा पाण्याचा होद, संपूर्ण गावातील सिमेंट कांक्रेट रस्ते, बंद गटार नाली बांधकाम, शेतकऱ्यांना विहिरी, ठिंबक सिंचन, महीला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॅक्टर व शेतीपूरक औजारे,गाई म्हशी योजना,बकरी पालन योजना,सौर उर्जा वर चालणारे शाळा व ग्रामपंचायत मधील साहित्य असे एक ना अनेक योजना आखल्या व त्या सर्व राबविण्यात मोलाचा वाटा उचलला यामुळे त्यांना आदर्श सरपंचांचा ३लक्ष रुपयांचा बक्षीसाचा मानकरी ठरला. ते सरपंच असताना त्यांच्यावर तमुस अध्यक्ष पदाची जबाबदारी गावकऱ्यांनी दिली त्यात ते सरस कामगिरी करून महाराष्ट्र सरकार चे २लक्ष रूपयाचे बक्षीस त्यांनी आपल्या ग्रामपंचायत ला मिळवून दिले.एवढे करुनही त्यांनी या सर्व कामांचे श्रेय हे आपले एकट्याचे नसुन ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांचे आहेत असे निरोप समारंभात बोलत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांजेकर सर यांनी केले तर आभार झाडे यांनी मानले.