कापूस व धान या पिकावर तंबाखू खाणाऱ्या अडीचा नियंत्रण करण्याकरिता कृषि सहायक विजय पत्रे सरांच मार्गदर्शन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस आसमवार चामोर्शा
चामोर्शी:- पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर पूरग्रस्त क्षेत्राणजीक सोयाबिन व कापूस पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी(स्पोडोप्टेरा)अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीचे वर आढळून येत असून सदर अळीचे नियंत्रणाकरिता सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक स्वरूपात फवारणी करणे आवश्यक असून एकट्या दुकट्याने फवारणी करून भागणार नसून सदर किडीच्या नियंत्रणाकरिता सामूहिकपणे फवारणी करण्याची नितांत गरज आहे.अन्यथा फार मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे.करिता सदर अळीचे नियंत्रणाकरिता प्रोफेनोफॉस50 ई. सी. 20 मिली, क्लोरअंट्रीनोप्रोल 18.5एस.एल.3 मिली, इंडोक्झिकार्ब 15.8 ई. सी.7मिली, डायक्लोरोव्हास 76 ई. सी.5 मिली, स्पिनोसॅड 5एस जी 4 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किडनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापूस व धान या पिकावर तंबाखू खाणाऱ्या अडीचा नियंत्रण करण्याकरिता कृषि सहायक विजय पत्रे सर यांनी चामोर्शी तालुक्यातील जैयरापमुर, मुधोली परिसरातील लोकांना फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आले