विरूर स्टेशन मधील संपूर्ण परिसर डि कंटेन्मेन्ट झोन म्हणून घोषीत.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 14, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:-
दिनांक - 31/08/2020 रोजी राजुरा उपविभागातील मौजा विरुर स्टेशन ता . राजुरा संपुर्ण गाव या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे हा परिसर या कार्यालयाचे आदेश क्रमांक / कावि / कलि / प्र .3/2020/246 दि. 31/08/2020 या आदेशान्वये प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आले होते. व दिनांक - 31/08/2020 पासुन ते दिनांक -14/09/2020 पर्यंत सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रात आरोग्य विभागा मार्फत नागरीकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे . व सदर तपासणीत ILI व SARI या संसर्गजन्य रोगापासुन बाधित रुग्ण निरंक आहेत . तसेच कोरोना बाधित रुग्णाचे संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीचे स्वव ( नमुना ) प्रयोग शाळेत तपासणी केली असता तपासणीत संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे Covid -19 रिपार्ट निगेटिव्ह आले आहेत.
ज्या अर्थी मा.जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक / एमएजी/कार्या -8टे-3/2020/600/ दि 17/06/2020 अन्वये प्रतिबंधात्मक क्षेत्रात सिमा तात्काळ प्रभावाने बंद करणे व प्रतिबंधात्मक क्षेत्रात इतर कार्यवाही करण्याकरीता Sub Divisional Incident Commander म्हणुन उपविभागीय अधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मौजा विरुर स्टेशन ता . राजुरा संपुर्ण गाव या परिसरास कंटेन्मेन्ट झोन घोषीत करुन दिनांक - 14/9/2020 रोजी 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाल्यामुळे हा परिसर दिनांक -14/9/2020 रोजी रात्री ठिक 12.00 या वेळा पासुन डि कंटेन्मेन्ट झोन घोषीत करण्यात आले आहे.