Top News

घुग्घुस बायपास रस्त्यावरील झुडुपांचा कचरा साफ, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या समस्याचे तात्काळ निवारण.

चंद्रपुर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा पुढाकार.
Bhairav Diwase. Sep 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर 
चंद्रपूर:- घुग्घुस चंद्रपुर राज्य महामार्गवर डांबरीकरण केलेला घुग्घुसचा बायपास रस्ता आहे. घुग्घुस शहराच्या एक किलोमीटर अंतरावर हा बायपास रस्ता डांबरीकरण करुन बनविण्यात आला आहे. रस्त्यालगत शेती, मोठी झाडे असल्याने हा रस्ता निसर्गरम्य आहे, या रस्त्यावर आल्हादकारक वातावरण आहे. 

पोषक वातावरण असल्याने सकाळी व सायंकाळी दरम्यान लहान मुले, मुली, महिला व पुरुष "माॅर्निंग वाक" करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात.

सध्या या रस्त्यालगत लहान झुडपे, बाभळीचा कचरा तयार झाला होता. त्यामुळे रस्त्यावर साप, विंचु यायचे, माॅर्निंग वॉक करण्या-यांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.

हि समस्या लक्षात घेत घुग्घुस निवासी चंद्रपुर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पुढाकार घेऊन जेसिबी मशीनने रस्त्यालगतच्या झुडुपांचा कचरा साफ केला.

हा बायपास रस्ता अर्धवट असल्याने बंद अवस्थेत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक माॅर्निग वाक साठी येतात. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे आपल्या माॅर्निंग वाक टिम सह तिथे जातात. त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट येताच त्यांनी तात्काळ साफसफाई केली. रस्त्याची साफसफाई बघून सर्व मॉर्निंग वॉक करणाऱ्या बंधू-भगिनींनी आनंद व्यक्त केला व देवराव भोंगळे यांचे आभार मानले.

 यावेळी घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश बोबडे, पतंजली योग समितीचे अध्यक्ष अनिल नित, अमोल थेरे, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग थेरे, प्रविण सोदारी, प्रा. अरविंद आसुटकर, सैय्यद मुस्तफा, कोमल ठाकरे, निरंजन नगराळे, धनराज पारखी, रवि चुने, श्रीनिवास कोट्टुर, सुशील डांगे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने