Click Here...👇👇👇

उमेद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांसाठी निधी उपलब्ध करून द्या.

Bhairav Diwase
आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदना द्वारे मागणी.
Bhairav Diwase. Sep 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन 2011 पासुन संपुर्ण राज्यात सुरू आहे. या अभियांना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन, तालुका व्यवस्थापन कक्षा अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमिकरण, आर्थिक सामाजिक व राजकीय जिवन बदलाचे प्रतिक म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात अभियान सुरू असुन या अभियानात जिल्हा स्तर वर तालुका स्तरावर वेगवेगळया पदावर अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्हयात या अभियाना अंतर्गत जवळपास 2500 कंत्राटी कर्मचारी कार्यरत असुन कर्मचाऱ्याना वर्षभरापासुन वेतन मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन करीता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री यांचेकडे निवेदना द्वारे केली आहे. 
            महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सन 2020-21 साठी 28 कोटी 88 लक्ष 74 हजार निधी मंजुर आहे. सप्टेंबर 2020 अखेर राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुंबई कडुन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षास 3 कोटी 80 लक्ष ऐवढा निधी प्राप्त झालेला आहे. अपुऱ्या निधी अभावी कर्मचाऱ्यांचे देयके देण्यास विलंब झालेला आहे. समुह संसाधन व्यक्ती यांचे मानधन देयके माहे सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० तसेच CTC, बँक सखी, FL-CRP यांचे मानधन देयके माहे जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२० मिळालेले नाही. त्यामुळे अभियानातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबियावर उपासमारीची वेळ उदभवलेली आहे. 
            हि गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर करीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदना द्वारे कळविले आहे.