Top News

चक्क कोरोना रुग्णाचा मृतदेह आणला घरी.

Bhairav Diwase. Sep 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
भद्रावती:- शहरातील भोज वार्डात जावयाच्या घरी कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने येथील उपचारानंतर डॉक्टरांनी चंद्रपूर येथे रेफर केल्यानंतर त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याने अंत्यविधी करण्यासाठी भोज वार्ड येथे मृतदेह आणल्याने या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
येथील  सासरे भद्रावतीत आले असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. त्यांना जैन मंदिर येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले होते त्यानंतर त्यांना होम क्वारन टाईन ठेवण्याकरिता आणले असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किनाके यांनी चंद्रपूर कोव्हीड सेंटर येथे हलविण्याचा सल्ला दिला परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने या सर्व प्रकाराची माहिती लपवून त्याचा मृतदेह राहत्या घरी भोज वार्ड येथे आणला व संपूर्ण रात्र मृतदेह ठेवल्यानंतर पहाटे शेकडोंनी त्याच्या घरी भेटी दिल्या त्यानंतर रीतसर त्याचा विधी करून अंत्यविधी साठी पाठविण्यात आले. हा संपूर्ण प्रकार चालू असतानासुद्धा या रुग्णाचा कोरोना ने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले नाही. सरकारी प्रशासनाने सुद्धा या प्रकाराकडे काळजीपूर्वक लक्ष न दिल्याने येथील कोरोना बाधित झाला तर जबाबदार कोण असा सवाल वार्ड वासी करत असून येथील नागरिकांचा रोष वाढला आहे. सरकारी प्रशासनाच्या कायद्याला ठेंगा दाखवणाऱ्या वर कारवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


या प्रकाराबाबत तहसीलदार यांच्याशी विचारणा केली असता हा रुग्ण कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत होता आज पहाटे डॉक्टर किनाके यांचा फोन आला होता या रुग्णाला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते परंतु त्याच्या नातेवाईकांनी मृत्यू झाल्यानंतर परस्पर घरी आणले.
महेश शितोळे 
तहसीलदार भद्रावती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने