Top News

शिक्षकांना अध्ययन, अध्यापन अहवाल मागणारे पत्र रद्द कराशिक्षक भारतीची मागणी.

Bhairav Diwase. Oct 01, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या संचालकांनी दि.२४ सप्टेंबरला पत्र काढून मुख्याध्यापक व शिक्षक यांना अध्ययन व अध्यापन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.हे आदेश रद्द करण्यात यावे या आशयाच्या मागणी चे निवेदन शिक्षक भारतीने राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना दिले.
                    कोरोना महामारीमुळे या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरु नसल्या तरी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु आहे. ऑनलाईन शिकवण्यासाठी वारंवार मागणी करुनही मुख्याध्यापक व शिक्षक यांना कोणतेही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने केली नाही. ऑनलाईन व ऑफलाईन प्रक्रियेतून अध्ययन अध्यापन सुरु ठेवण्यासाठी शिक्षक स्वतःच्या विविध क्षमता व कल्पना राबवून शिक्षण कार्यात सहभागी आहेत. विविध शैक्षणिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करीत आहेत.
-
                   याच काळात शिक्षकांना कोविड ड्युटी पार पाडावी लागत आहे. शिक्षण विभागाकडून आदेश येऊनही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून मुक्त करण्यात आले नाही. याऊलट नव्याने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत शिक्षकांना जुंपले जात आहे. अनेक शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांना कोविड ड्युटीमुळे आजाराने ग्रासले आहे. शिक्षक करत असलेल्या शैक्षणिक कामाचे नियोजन व निरीक्षण मुख्याध्यापक योग्यप्रकारे करत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी केलेल्या कामाचे साप्ताहिक अहवाल मागून एक जादा काम लावले आहे. परीक्षणाच्या संबंधित सर्व यंत्रणा कार्यरत असताना अशाप्रकारे काम देणे म्हणजे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर अविश्वास दाखवणे आहे. हे पत्र सरकारने रद्द करावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ मार्फत दिले आहे.
- निवेदन देताना शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,माध्यमिकचे भास्कर बावनकर,तालुका सचिव कैलाश बोरकर,कार्याध्यक्ष नरेश पिल्लेवान आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने