अबब.... लांबी १० फुट तर वजन अंदाजे ३० किलो चा सापडला अजगर.

Bhairav Diwase
अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवनदान.
Bhairav Diwase.    Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पारडी येथील शेतात नऊ फुटाचा अजगर सापडला असून सर्पमित्र व वनकर्मचारी यांच्या सहकार्याने अजगरास पकडून जंगलात सोडण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी वैनगंगा नदिला पुर आले होते त्या पुरात आलेल्या साप व जिव याना आसरा मिळेल तिथे थांबले होते. हा अजगर सुद्धा पुराने आले असल्याचे सांगीतल्या जात आहे. या अजगर सापची लांबी १० फुट तर वजन अंदाजे ३० ते ३५ किलोच्या आसपास आहे.
 पारडी येथील भानुदास गेडेकर यांच्या शेतात दि १४ सप्टे ला सकाळी ११.३०च्या सुमारास आढळला होता. शेतकाऱ्याने माहिती सर्पमित्राला दिली असता सर्पमित्र प्रकाश शेंडे, अमर मोहुर्ले व रवि वाढई यांनी शेतात जाऊन सापास पकडले. त्यानंतर सापला जंगलात सुखरूप सोडण्यात आले साप सोडत असताना वनविभागाचे कर्मचारी व्ही बी कांबळी वनपरिक्षेत्र अधिकारी सावली,व्ही एस भोयर क्षेत्र सहाय्यक पेंढरी, एस डब्ल्यू शेंडे वनरक्षक टेकाडी, सी एम गायकवाड वनरक्षक चारगांव व सर्पमित्र विवेक लेनगुरे आदी च्या उपस्थितीत अजगर सापाला जीवदान देण्यात आले.