Top News

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या.


Bhairav Diwase.      Sep 30, 2020

महाराष्ट्र:- कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण कराड तालुक्यातील ओंड येथे दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थींनीने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

साक्षी आबासो पोळ (वय 15, रा. ओंड, ता. कराड, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ओंड येथील पोळ कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. साक्षी पोळ ही इयत्ता दहावीत शिक्षण घेते. साक्षीचे वडिल आबासो बाळकू पोळ यांचा 2007 साली मृत्यू झाला आहे. वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ या साक्षी व तिच्या भावासह कष्ट करून उदरनिर्वाह करतात.

कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शाळांचे शिक्षक हे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. साक्षीकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती. मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. मंगळवारी दुपारी आई कामानिमित्त बाहेर गेली असताना साक्षीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. कराड ग्रामीण पोलिस घटनास्थळी भेट देऊन चौकशी करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने