Top News

अबब….. ११ वर्षाचा पोराने केले शेतावर अतिक्रमण.


वडिलांची जमीन राहूनसुद्धा मुलगा भूमिहीन कसा?

खैरगाव (रिठ) येथील शेतीवर अवैध ताबा घेणाऱ्या नेत्याची चौकशी करावी.
Bhairav Diwase. Sep 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- घुगुल-झाडे शेताचे प्रकरण सध्या खूप गाजत आहे. तुमची जमिन माजी सैनिक यांना बक्षिस देण्यात आल्याची खोटी माहिती देऊन बळजबरीने ताबा घेणाऱ्या हरीदास झाडे आणि तलाठी मेश्राम यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राजुरा तालुक्यातील माथरा लगतच्या खैरगाव रिठ येथील घुगुल कुटुंबाने राजुरा-चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मागणी केली होती.
एकीकडे जगाचा पोशिंदा कसे तरी कबाड कष्ट व छोटासा व्यवसाय करून घाम गाळून कमावलेल्या पैश्यांनी स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे. त्याच्या शेतावर राजकारणी हरिदास झाडे यांनी पटवाऱ्याशी संगनमत करून, शासनाची दिशाभूल करून, दमदाटी करून, खोटे-नाटे बोलून ताबा घेतला. पीडित घुगुल कुटुंबाने याची रीतसर तक्रार तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडे केली होती. तसेच आपली कैफियत चंद्रपूर व राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली होती. तत्कालीन तहसीलदारांनी सुद्धा अतिक्रमण गैरकायदेशिर व अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याने झाडे यांच्या विरुध्द महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ५० (२) अन्वये १०००/- (एक हजार रूपये) दंड आकारूण सदर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करण्यात येवुन ३ दिवसाचे आंत अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ५० (३) व (४) अन्वये १०००/- रू. दंड व प्रतिदिन ५०/- रू. प्रमाणे दंड वसुल करण्यात येईल, असा आदेश दि.२६.११.२०१५ रोजी पारित केला होता. स्वतःच्या विरोधात बनत असलेल्या माहौल ला बघून या महाशयांनी काही वर्तमान पत्रातील प्रतिनिधींना जाहिरातीचे लॉलीपॉप देऊन स्वतःच्या समर्थनार्थ बातम्या मध्यन्तरी प्रकाशित करून घेतल्या होत्या. जाहिरातीचे लॉलीपॉप घेतल्या नंतर काही जेष्ठ पत्रकारांच्या बातम्या वाचून, अबब… ११ वर्षाचा पोराने केले शेतावर अतिक्रमण म्हणण्याची वेळ वाचकांवर आली आहे. बातमीत नमूद केल्याप्रमाणे झाडे यांनी सन १९८७-८८ पासून या जागेवर कास्तकारी करीत असल्याचे म्हटले आहे. झाडे यांचा जन्म त्यांच्या आधार कार्डावर नमूद सन नुसार १९७६ असा आहे. त्यांनी अतिक्रमण केले सन १९८७-८८ म्हणजे अतिक्रमण करतेवेळी हरिदास झाडे यांचे वय ११ वर्ष होते. जे हास्यास्पद आहे. बातमीत नमूद केल्याप्रमाणे झाडे यांनी शासकीय नियमांनुसार भूमिहीनांना पट्टे देण्यात असल्याचा उल्लेख केला आहे. या अतिक्रमित जमिनीचा पट्टा मिळावा याकरिता अर्ज केल्याचा झाडे यांनी केला असा उल्लेख केला आहे. हरिदास झाडे यांचे वडील चंद्रभान भिवा झाडे यांचे नावाने १.४५ हे.आर. व २.०० हे.आर. जमीन असून मग त्यांच्या मुलगा हरिदास भूमिहीन कसा ? झाडे यांनी तहसील प्रशासनाची तर दिशाभूल केलीच आणि आता प्रसारमाध्यमांचा काही प्रतिनिधींना हाताशी धरून नागरिकांतही धूळ झोकत असल्याचा आरोप पीडित शेतकरी घुगुल कुटुंबाने केला आहे. तहसील प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास घुगुल कुटुंबाने उपोषणाचा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने