सदर मागणी मान्य केल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी नगरसेवक श्री. विशालजी निंबाळकर नगरसेवक, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष यांचे आभार मानले.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर तथा माजी पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ केली असुन आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना आता प्रतिमाह ४०००/- रुपये तथा शासन तर्फे १००० रुपये अस एकूण ५००० रुपये मानधन दिले जाणार आहे. नगरसेवक विशाल निंबाळकर हे या मागणीचा सतत पाठपुरावा करित होते.
अखेर या संबंधी श्री. देवरावजी भोंगळे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष ग्रामीण तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर उपमहापौर श्री. राहुलजी पावडे नगरसेवक श्री विशाल जी निंबाळकर श्री. ब्रिजभूषणजी पाझारे माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रपुर यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागणी मान्य केल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी श्री.आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री वने व नियोजन मंत्री, श्री. देवराव दादा भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष, सौ.राखीताई कंचर्लावार महापौर, श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष, श्री. राहुलजी पावडे उपमहापौर, श्री. विशालजी निंबाळकर नगरसेवक, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष, श्री.ब्रिजभूषणजी पाझारे भाजयुमो जिल्हाध्यक्ष यांचे आभार मानले.