घुग्घुस येथील विहिरीवर लोखंडी जाळी व कटघराचे बांधकाम सुरु.

Bhairav Diwase

चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे व घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांच्या प्रयत्नांना यश.
Bhairav Diwase.    Sep 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- घुग्गुस येथील वार्ड क्रमांक ३ मधील माऊली मंदीरा जवळील खुल्या जागेवर मागील अनेक वर्षापासुनची जुनी ७० फुटाची विहिर होती. कालांतराने विहिरी कचरा काडी टाकल्याने हि विहिर बुजून गेली. विहिर बुजून गेल्याने वार्डातीलच लहान मुले खेळत असतांना या विहिरीच्या खड्ड्यात पडत असे व फिरनारे जनावरे देखील याच विहिरीच्या खड्ड्यात पडत होते.

बुजलेल्या विहिरीचा नाहकत्रास वार्ड वासीयांना आता सहन करावा लागत होता.वार्डातील नागरिकांनी व युवकांनी शुभम यादव यांच्या माध्यमातून चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे व घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे,यांना वार्डतील बुजलेल्या विहिरीची समस्या सांगीतली त्यांच्या प्रयत्नातुन बुजलेल्या विहिरीच्या कटघराचे बांधकाम व विहिरीवर लोखंडी जाळी लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विहिरीच्या कामास निधी तातडीने उपलब्ध करुन दिल्या बद्दल वार्डातील शुभम यादव व युवकांनी आभार मानले आहे.