"मुलीचे हक्क आणि सुरक्षितता", "बेटी बचाओ बेटी पढाओ" व "बाल विवाह प्रतिबंध" व "बालकांवरील अत्याचार" या विषयावर सखोल मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ग्रामपंचायत चकफूटाना अंतर्गत.
Bhairav Diwase. Sep 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ग्रामपंचायत चकफूटाना अंतर्गत "मुलीचे हक्क आणि सुरक्षितता", "बेटी बचाओ बेटी पढाओ" व "बाल विवाह प्रतिबंध" व "बालकांवरील अत्याचार" या विषयावर सखोल माहिती देण्यात आली.  बालविवाह कायदा 2006 व ग्राम बाल संरक्षण समिती मध्ये  कोण कोण असतात व त्यांची समाजाविषयी ची जबाबदारी काय आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बालविवाह या विषयावर चित्रपट दाखवण्यात आले. चित्रपट संपल्यावर बालकावर अत्याचार होऊ नये याबाबत माहिती देण्यात आली.मुलांना घरात आणि समाजात शिक्षण,सुरक्षा, सन्मान,समावेश आणि सरंक्षण मिळावे यासाठी पालकांना मार्गदर्शन आणि जनजागृती गेल्या 3 वर्षांपासून अभियानाच्या माध्यमातून करण्यात येते. कोरोनामुळे मूले घरीच असल्याने त्यांना घरच्या घरी शिकवणी सुरू करून त्यांचे कला गुणांना वाव द्यावा याबाबत विडिओ दाखविण्यात आला. मागील 10 वर्षात एकही बालविवाह झालेला नाही व बाल विवाह होणार सुद्धा नाही अशी शपथ घेण्यात आली.
  'बालविवाह प्रतिबंध’ आणि ‘बालकांवरील अत्याचार’ यावर अधिक प्रभावीपणे  जनजागृती  तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने गावातील किशोरवयीन मुली व मुले, उपस्थित महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आला.
  1098 हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर बद्दल सर्वांना माहीती दिली.  बालकांचे हक्क व अधिकाराबाबत माहिती देऊन बालकांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमा अगोदर मा.सरपंच तुळशीराम जी रोहनकर यांच्या हस्ते मास्क आणि डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले.
         कार्यक्रमाला गावचे सरपंच तुळशीराम जी रोहनकर,vstf चे जिल्हा समन्वयक विद्या पाल मॅडम,ग्रामपरिवर्तक धर्मेंद्र घरत, ग्रामपरिवर्तक हिराचंद रोहनकर,ब्लॉक समन्वयक विशाल पावडे,क्षेत्र सहाय्यक कैलास कक्कलवर,आरोग्य सेविका शेडमाके मॅडम,CTC कोमल बिस्वास,अंगणवाडी सेविका माधुरिताई बोंमावर, मदतनीस कानमपल्लीवर, राजूभाऊ अर्जुनकर तसेच किशोरवयीन मुले मुली,पालक वर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोशल डिस्टन्सस्टिंग व पोषक आहार देऊन पार पडला.