पूर्व विदर्भातील पुरपीडित शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजारांची मदत द्या:- शून्य प्रहरात खासदार अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा व इतर नद्यांना महापूर आला त्यामुळे पूर्वविदर्भातील लाखो हेकटर शेतीचे मोठे नुकसान झाले तसेच पुरामुळे शेकडो घरे शतीग्रस्त झाल्याने अनेक गरीब कुटुंब बेघर झाले व शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता शासनाने पुरग्रस्तांना हेक्टरी 30 हजार व फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी व घरे पडलेल्या गरजू नागरिकांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे तसेच अन्नधान्यसाठी पुरपीडित नागरिकांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 21 सप्टेंबर 2020 रोजी शुन्य प्रहरात लोकसभेत केली.

     लोकसभेत निवेदन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पूर्ण गेट 4 मीटर ने उघडण्यात आले त्यामुळे एकावेळी महापूर येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत महाराष्ट्र शासनाने वैनगंगा नदीकाठच्या  गावांना कोणतीही पूर्वसूचना  दिलेली नव्हती त्यामुळे मोठा महापूर येऊन नदीलगतची  गावे पूर्णतः उध्वस्त झाली. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन  हजारो हेक्टर शेती खरडून निघाली तसेच शेकडो पशुधन पुरात वाहून गेले एवढेच नव्हे तर पुराचे पाणी घरात शिरल्याने घरांची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने  शेकडो नागरिक बेघर झाले असल्याचे यावेळी खासदार अशोक नेते लोकसभेत सांगितले.
  त्यामुळे पुरपीडित गरीब, शेतकरी, शेतमजूराना पोटाची खळगी भरण्यासाठी तातडीची 10 हजारांची मदत शासनाने द्यावी व शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये मदत घोषित करून  गरजूंना तातडीने घरकुल मंजूर करण्यात यावे अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी शून्य काल मध्ये लोकसभेत केली व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.