रुग्णांना सर्वोत्तम सेवा हाच प्रयत्न:- पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार

Bhairav Diwase
पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी.
Bhairav Diwase.    Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना बाधिताला उत्तमोत्तम उपचार देताना खान पानाची  व्यवस्था, औषधे तसेच मानसिक बळ देऊन सर्वोत्तम सेवा देणे गरजेचे आहे. अशा सुचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे उपस्थित होते.

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोविंड रुग्णालयातील सर्व वार्डातील पाहणी केली.

पाहणी करतांना ना. वडेट्टीवार म्हणाले, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा ड्युटी चार्ट वेळे आधीच तयार असावा. वार्डात कशाप्रकारे कर्मचारी सेवा देत आहे याची माहिती ठेवावी. जेणेकरून येणाऱ्या रुग्णाला कोणत्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची ड्युटी आहे हे कळेल. त्यासोबतच वार्ड निहाय दाखल रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात.

रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य आवश्यक बाबींची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. त्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य रीतीने वापर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल.