Click Here...👇👇👇

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण.

Bhairav Diwase
ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती.
Bhairav Diwase.   Sep 16, 2020
नागपुर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:चं विलगीकरण केलं असून आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.


नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. तपासणी केली असता मला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा.