Click Here...👇👇👇

बँकेत आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या निराधार महिलेचे पासबुक फाडले.

Bhairav Diwase
भारतीय स्टेट बँक शाखा चिरोली येथील धक्कादायक प्रकार.
Bhaiav Diwase.    Sep 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- बँकेत आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या एका निराधार महिलेचे पासबुकच कर्मचाऱ्याने फाडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार येथील भारतीय स्टेट बँकेत आज घडला. या घटनेने निराधार वृदध महिला पुरती गोंधळली. बँकेने हे प्रकरण नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणाची येथील आम आदमी पार्टीने तालुका प्रशासनाकडे बँकेच्या विरोधात तक्रार केली आहे. 

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत केंद्र शासनाने निराधार महिलांना अनुदान दिले. अनुदानाची रक्कम बँकेत जमा करण्यात आली. केंद्र शासनाच्या जनधन या योजनेत बऱ्याच महिलांनी बँकेत आपआपले खाते उघडले आहे. अश्याच प्रकारचे खाते येथील भारतीय स्टेट बॅकच्या मूल शाखेत चिरोली येथील अरूणा मोहुर्ले या निराधार वृदध महिलेने उघडले होते. आज ती आधार लिंक करण्यासाठी बँकेत गेली असता येथिल एका कर्मचाऱ्याने तुझा पासबुक जुना झाला असल्याचे कारण सांगितले. आणि तिच्या समोरच पासबुक फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकले. बँकेच्या वागणुकीने अपमानीत झालेल्या या महिलेने कचऱ्याच्या पेटीतून आपले फाडलेले पासबुक उचलून घरी गेली. प्रत्येक बँकेने ग्राहकांशी सौजन्याने वागावे असे केंद्रशासनाचे निर्देश आहेत. तरीही सदर वृदध महिलेला भारतीय स्टेट बँकेत फटका बसला.

 दरम्यान या प्रकरणाची आम आदमी पार्टीने दखल घेतली असून बँकेच्या विरोधात मूल येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरण गंभीर असल्याने संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष गौरव श्यामकुळे आणि तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी केली आहे.