जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
Bhairav Diwase. Sep 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- दि.11 सप्टेंबर आज पहाटे 05:40मिनिटांनी: गोसीखुर्द धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे एकूण 33 दरवाजे 1. मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मुल आदी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने 3067 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, दिवसभरात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून १० ते १५ हजार क्युमेंक्स पर्यंत विसर्ग वाढू शकतो.