(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- अखिल भारतीय तेली समाज महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना जयदत्तजी क्षिरसागर साहेब (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व प्रदेश अध्यक्षा सौ.प्रियताई महिंदरे,कोषाध्यक्ष श्री कृष्णराव हिंगनकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्ष युवक आघाडी श्री सुखदेवजी वंजारी यांच्या विनंतीनुसार चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री देवेंद्र बेले यांची महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक बांधीलकी जोपासून समाजकार्य करणाऱ्या एका सच्चा व उमद्या कार्यकर्त्याची तेली समाज महासभेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री देवेंद्र बेले यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.तळमळीचा,चिकटीचा, सामाजिक जाणीव जपणाऱ्या श्री देवेंद्र बेले कडून तेली समाजाच्या विकासात मौलाचे भर पडेल अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहे,
श्री देवेंद्र बेले यांनी आपल्या नियुक्ती बद्दल श्री जयदत्तजी क्षीरसागर, सौ.प्रियाताई महेंद्ररे, श्री सुखदेवजी वंजारी यांचे आभार मानले,
श्री देवेंद्र बेले यांची चंद्रपूर तेली समाज महासभेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ.विश्वास झाडे, अँड.दत्तभाऊ हजारे, नगरसेविका वीणाताई खनके, नगरसेविका कल्पनाताई बागूळकर, नगरसेविका हजारेताई, माजी नगरसेवक श्री रविंद्रजी जुमडे, श्री दीपक बेले, सौ मीनाक्षी गुजरकर, श्रीमती कोकिळाताई पोटदुखे,सौ चंदाताई वैरागडे, श्री राजेश बेले काविष लाकडे, श्री दिनेश जुमडे, श्री गणेश उमाटे श्री संतोष पोटदुखे, श्री भुवन बेले,श्री सुनील बानकर, श्री विलास बेले, श्री विक्की झाडे, श्री संजीव बेले, श्री बाळकृष्ण वैरागडे, श्री अमीत वैरागडे, श्री राहुल लोणकर, श्री प्रशांत येनूरकर, श्री संजय जुमडे, यांनी अभिनंदन केले.