किसान युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा तालुका अध्यक्ष पदी शुभम विठ्ठलराव कोहपरे यांची नियुक्ती.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- संस्थापक अध्यक्ष- श्री. यशवंत गोसावी साहेब यांच्या आदेशानुसार शुभमभाऊ कोहपरे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

शुभम कोहपरे यांना आता श्री.यशवंत गोसावी(संस्थापक किसान युवा क्रांती संघटना) यांच्या नेतृत्वाखाली जात, धर्म, लिंगभेद, राजकीय पक्ष यांचा संघटनेमध्ये उल्लेख न करता कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आपल्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचे प्रश्न ,समस्या सोडविन्यासाठी कटिबद्ध रहावे लागणार आहे. समोर आलेल्या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी काय करणार यावर संपूर्ण क्षेत्राचे लक्ष लागुन असेल यात शंकाच नाही.