कोरोना मुळे शाळा बंद; पालकांची वाढली डोकेदुखी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   Sep 21, 2020


चंद्रपूर:-
शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत मात्र मुलांच्या खोडकरपणामुळे पालक वर्गात आता मुलांची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. कोरोना संसर्गामुळे राज्यातील शाळा मार्चपासून बंद झालेल्या आहेत. शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत गावी, परगावीही जाता येत नसल्याने घरात मुलांबरोबर पालकांचा वादविवाद होत आहे. लहान मुलांच्या खोडकरपणाला पालक पार कंटाळून गेले आहेत. या मुलांचा हट्ट पुरवता पुरवता पालकांच्या नाकी नऊ येत आहे. तर दहावीचे व महाविद्यालयीन मुले हातातील स्मार्ट फोन सोडायला तयार नाहीत सध्या तरुण मुले मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यात मग्न होऊन गेले आहेत शाळा व खासगी शिकवणी, क्लास बंद असल्याने मुले पूर्णवेळ रिकामे आहेत.

         या मुलांना अभ्यास व पालकांनी सांगितलेल्या कामाचेही भान राहत नाही परिसरात गेम खेळण्याच्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे काही गेम ऑनलाइन खेळले जात असल्याने व मुलांना ऑनलाइनवर साथी, सोबती भेटत असल्याने प्रत्यक्ष गेम खेळण्यास सोबती लागत नाही यामुळे ग्रामीण भागातून मुले गेम खेळण्यासाठी मोबाइलला रेंज यावी म्हणून घराच्या गच्चीवर, गावाबाहेर, झाडावर बसून एकटेच हा गेम तहान, भूक हरवून खेळतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे अनेक पालकांनी मुलांच्या हातातील फोन रागात हिसकावून भिंतीवर फेकून फोन फोडून टाकल्याच्या घटना परिसरात घडलेल्या आहेत तर काही पालक मुलांना फोन घेऊन दिल्याचा पश्चात्ताप व्यक्त करीत आहेत एकंदरीत तरुण पिढीला स्मार्ट फोनच्या माध्यमातून ऑनलाइन गेम, सिनेमा, यूट्यूब या मनोरंजन व इतर बाबींनी चांगलाच विळखा घातला असून मुले पूर्वपदावर आणायला पालक, शिक्षक यांना भविष्यात मोठी कसरत करावी लागणार आहे हे मात्र निश्चित