शासन मान्य पुरोगामी पत्रकार संघ तालुका गोंडपिपरी कार्यकारिणी गठित.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
गोंडपिपरी:- शासन मान्य पुरोगामी पत्रकार संघ शाखा गोंडपिपरीच्या तालुका संघटक पदी अमित उईके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांचे अध्यक्षतेखाली व त्यांचे उपस्थितीत कार्यकारिणी गठीत करण्यात आली. तर नागेश बाजीराव इटेकर तालुकाध्यक्ष, गणेश पुंडलिक डहाळे तालुका उपाध्यक्ष, विनोद मनोहर पाल तालुका कार्याध्यक्ष, नितीन रामटेके तालुका सचिव, अमित उईके तालुका संघटक, चेतन मांदळे तालुका कोषाध्यक्ष, निलेश पद्मगिरीवार तालुका सहसचिव, इत्यादी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली व कार्यकारिणी घोषित करण्यात आली. गोंडपिपारी तालुक्यातील नगर पंचायत गोंडपीपरी च्या नगराध्यक्षा सौ. सपनाताई साखलवार यांचा आज पुरोगामी पत्रकार संघा तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आधार न्यूज नेटवर्क परीवारा तर्फे नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सभासदांचे मनपुर्वक अभिनंदन. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.