घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांच्या प्रयत्नातुन मृतकांच्या कुटुंबीयास २ लाखांचा आर्थीक मोबदला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- रविवारला ४ वाजता दरम्यान आशुतोष विजय बंन्सोड (२२) रा. म्हातारदेवी हा दुचाकी क्रमांक एम एच ३४ एच ११०९ ने घुग्घुस येथुन म्हातारदेवी गावाकडे घरी परत जात असतांना जैन ट्रान्सपोर्ट कंपणीच्या खुले सिमेंट वाहतुक करणा-या बल्कर कॅप्सुल टॅकर क्रमांक एमएच ३४ एबी ५५४७ मागुन धडक दिली धडकेत युवक गंभीर जखमी झाला व दुचाकी ही चेंदामेंदा झाली. जखमी अवस्थेत युवकाला जमलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिकेने चंद्रपुर येथे पाठविले परंतु खाजगी रुग्णालयातच त्याचा मॄत्यु झाला. हि वार्ता पसरताच म्हातारदेवी येथील नागरिक व तंमुस अध्यक्ष सुरेंद्र झाडे यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठले. हि माहिती मिळताच घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी ही घुग्घुस पोलीस स्टेशन येथे धाव घेतली व मॄतकाच्या कुटुंबीयासह जैन ट्रान्सपोर्ट मालक, कंपणीच्या सुपरवाइजर सोबत आर्थीक मोबदला देण्यासाठी चर्चा केली. मॄतक आशुतोष बंन्सोड यांच्या कुटुंबीयांना घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी तात्काळ २ लाख रुपयाची आर्थीक मोबदला मिळवुन दिला. व जवळपास 10 लक्ष रुपयांचे इन्शुरन्स ट्रक मालक इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून करून देतील असे ठरले. दरम्यान घुग्घुस पोलीस स्टेशन येथे मोठी गर्दी गोळा झाल्याने ताणावाची स्थिती निर्माण झाली.
गरिबीची परिस्थिती असल्याने आशुतोष हा रोज मजुरीचे काम करीत होता घरातील एकुलता एक कमावता होता. आई ही लकवाग्रस्त आहे व दोन भाऊ लहान भाऊ त्याला आहे. युवकाच्या मॄत्युने म्हातारदेवी गावात शोककळा पसरली आहे.
या वेळी घुग्घुस भाजपा युवा नेते अमोल थेरे, अनवर खान भाजपा ट्रान्सपोर्ट युनियन आघाडीचे अध्यक्ष अजय आमटे, सरफराज पटेल, मोबीन खान, कलीम खान, बबलु सातपुते, म्हातारदेवीचे पोलीस पाटील अजय कोहचाडे, असगर खान,पंकज रामटेके, कोमल ठाकरे व म्हातारदेवी ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.