Bhairav Diwase. Sep 23, 2020
अकोला:- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या दानापूर येथे दारुड्या मुलाने बापाची हत्या केल्याची घटना 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दानापूर येथे महादेव मिसाळ वय 60 वर्ष यांची त्यांचा मुलगा नारायण मिसाळ याने हत्या केली. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने गावशिवारात खळबळ उडाली आहे.