Top News

चंद्रपुरात उभ्या राहणाऱ्या जम्बो कोविड रुग्णालयावरून पारोमिता गोस्वामींचा गंभीर आरोप.


Bhairav Diwase.    Sep 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपुरात उभ्या होत असलेल्या खासगी जम्बो रुग्णालयावरून आतापासूनच आरोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय यंत्रणा दुबळी करून नफा कमावण्यासाठी उभे केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी केला आहे. या आरोपांमुळे हे रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडतं की काय असा प्रश्न पडायला सुरूवात झाली आहे.

कोरोनाचा फैलाव कोरोना जिल्ह्यातही होत असून जिल्ह्यात आजघडीला आठ हजारांवर रुग्ण इथं झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहाता शासकीय वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडू शकते. हे लक्षात घेऊनच इथे जम्बो कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनानं खासगी क्षेत्राला यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. डॉक्टरांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला होता आणि सातशे खाटांचं सुसज्ज जम्बो रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. चंद्रपुरातील शकुंतला लॉन इथं हे खासगी रुग्णालय सुरू करण्याचं निश्चित झालं आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी हे रुग्णालय पैसे कमावण्यासाठी उभे केले जात असल्याचा आरोप केला आहे. खासगी जम्बो रुग्णालयाला मान्यता दिल्याबद्दल गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनही केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात गरीबांसाठी 50 टक्के खाटा राखीव ठेवण्यात याव्यात अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून व्हायला लागली होती. या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने