मोटरबोटच्या सहाय्याने शोध मोहिम राबवत मृतदेहाला सापडला.
भद्रावती:- श्री. अनिकेत अरुण वैदय रा. कुचना ता. भद्रावती वय वर्ष 21 या युवकाने 26/09/2020 शनिवार रोजी सायं 4 वाजताच्या सुमारास पाटाळा येथील पूलावरून वर्धा नदीमध्ये उडी मारली. तहसिलदार, भद्रावती यांनी याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कळविली. त्यानुसार मा. निवासी उप जिल्हाधिकारी मनोहर गहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शोध व बचाव पथकाने 27/09/2020ला सकाळी 10:30 वाजता मोटरबोटच्या सहाय्याने शोध मोहिमेला प्रारंभ केला. घटनास्थळापासुन अंदाजे 3km अंतरावर वर्धा नदीमध्ये 1:00 वाजता श्री अनिकेत अरुण वैदय यांचा मृतदेह मिळाला. विनय गिनगुले, अजय यादत, राहुल पाटिल, राजू निंबाळकर यांनी मोटरबोटच्या सहाय्याने शोध मोहिम राबवत मृतदेहाला सापडला. शवविच्छेदनासाठी तालुक्याला नेण्यात आले असून. पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहे.