तांबे हॉस्पिटल नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास.
भंडारा:- भारतीय जनता पार्टीच्या पुर्व महिला बालकल्याण सभापती, भाजपा महीला प्रदेश कार्यकारिणी च्या सदस्या तथा भंडारा जिल्हा अध्यक्षा भाजपा महिला आघाडी गिताबाई शरद कापगते साकोली यांचे आज कोरोनाने तांबे हॉस्पिटल नागपुर येथे दुख:द निधन झाले आहे.
पक्षाच्या महिला सशक्तिकरणासाठी सदैव झटणाऱ्या सदोदीत पक्षवाढिस्तव प्रयत्नरत असणाऱ्या सक्षम कलावंत, उत्तम वक्ता तथा मार्गदर्शिका आपल्यातुन निघून गेल्यात ही खुप दुख:ची बाब आहे
त्यांच्या कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळलेला आहेत. परीवाराला दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐