Top News

मुल डी. बी. पथकाची मोठी कार्यवाही सिने स्टाईल पाठलाग करुन केली दारु जप्त.

लाखाचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत.

Bhairav Diwase. Sep 28, 2020
(संबंधित छायाचित्र)


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- चंद्रपुर जिल्हयातील मुल पोलिस स्टेशन चा डी बी पथकाची कार्यवाही दि. 27/09/2020 ला रात्री 10:15 वा. ते 11:30 वाजताच्या सुमारास नाकेबंदी करुन अशोक लेलॅड वाहना मध्ये 60 पेटी ( 6000 नग ) देशी दारु किंमत अंदाजे 6,00,000/-, वाहन किंमत अंदाजे 6,00,000 रुपये व एक मोबाईल किंमत अंदाजे 10,000 रुपये असे एकूण 12,10,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रात्री 10:30 वा . ते 11:30 वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे दारु येत असल्याची माहिती मुल पोलीस स्टेशनच्या डि.बी. पथकाला मिळाल्या नंतर सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे आणि पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी आपल्या टीम नापोशी पुडंलिक परचाके, पोशी शफिक शेख, गजानन तुरेकर, संजय जुमानके, श्रावण कुत्तरमारे सह नाकेबंदी करुन अशोक लेलॅड वाहनाना पकडून, लाखाचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही या सप्ताहातील डि.बी. पथकाची तिसरी कारवाई आहे. या धाडीमुळे दारु तस्करांचे चांगलेच धाबे दनाणले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने