वन्य प्राण्यांच्या रक्षणात वन विभाग (व्याहाड खुर्द क्षेत्र) अपयशी:- अनिल स्वामी यांचा आरोप.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 28, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील वनविभागाचे व्याहाड खुर्द क्षेत्र मध्ये मागील सहा महिन्यात एक वाघ व एक बिबटाची शिकार करण्यात आली आणि परत रविवारी एक बिबटाची मृत्यू हा संशयास्पद आढळून आला. 
              व्याहाड खुर्द क्षेत्राचे क्षेत्रपाल हे यावर नियंत्रण मिळविण्यात वारंवार अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आपल्या क्षेत्रात ते जंगलात गस्तीला जातात कि काय यावरही संशय निर्माण होतो.
                   मागील काळात कापसी येथील लहान मुलाला वाघाने ठार मारले त्यावरून सदर परिसरात वाघाचे वास्तव याची कल्पना वनविभाला नव्हती त्यामुळे याचा नाहक बळी तो लहान मुलगा ठरला.
                   तसेच सदर क्षेत्रात जंगली प्राण्यांची अवैध शिकार सुद्धा सुरु असून यावर अजूनपर्यंत अंकुश लावण्यात आले नाही त्यामुळे अवैध शिकरिस क्षेत्रपाल यांचे सहकार्य तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. तसेच अवैध शिकार करणाऱ्यांवर अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेले नाही त्यामुळे क्षेत्रपाल यांचे अभय तर नाही हाही प्रश्न निर्माण होतो.