गडचिरोली:- आयकॉन बहुद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था व स्थानिक आरोग्य प्रशासन विभाग मारोडा अंतर्गत आज दिनांक 28,09,2020 ला सार्वजनिक चौकात कोरोना विषाणू बाबत जनजागृती व त्यावरील घ्यावयाची दक्षता या बाबत सामाजिक अंतर ठेवून मार्गदर्शन करण्यात आले.
मा.आरोग्यसेविका मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना हा एक विषाणू असून या विषाणू ला घाबरून न जाता योग्य त्या प्रकारे काळजी घेतली तर या वरती विजय मिळवू शकतो ,कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त सामाजिक अंतर ठेवने गरजेचे आहे,नियमित कोणत्याही साबणाने स्वछ हात धुणे गरजेंचे आहे,घराबाहेर पडल्यास नाकाला व तोंडाला मास्क बांधणे गरजेचे आहे,बाहेरून आल्यानंतर स्वछ अंघोळ करणे गरजेचे आहे,आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे ,असल्याप्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले ,
याच सोबत उपस्थित लोकांचे थर्मामिटर च्या साहाय्याने तापमान व ऑक्सिमिटर च्या साहाय्याने ऑक्सिजन लेव्हल मोजण्यात आली
कोरोना हा एक नैसर्गिक विषाणू असून या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शारीरिक क्षमता कमी होतें परंतु सामाजिक जनमानसात या बाबत एक प्रकारची अशस्पृश्यता निर्माण होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे व यामुळे सामाजिक प्रेम ,आपुलकी व सामाजिक साहाय्य कमी होताना दिसत आहे ,
कोरोना हा एक विषाणू असून याचा कोणत्याही जातीपाती,गरीब श्रीमंत ,असा कोणताही भेदभाव करत नाही मनून समाजात ज्या व्यक्तीला कोरोना झाला त्या व्यक्तीशी योग्य ते अंतर ठेवून बोलणे सोडू नये त्या व्यक्तीची हेडसांड करू नये उलट त्या व्यक्तीला धीर द्यावे जेणे करून तो व्यक्ती लवकर बरा होण्यास मदत होईल .
या जनजागृती कार्यक्रम स्थानिक आरोग्य सबसेंटरच्या आरोग्यसेविका सातपुते मॅडम,आशा ठाकूर मॅडम आरोग्य सेविका,आशा वर्कर मोहितकर मॅडम, मा. बावणे सर मुख्याध्यापक जि.प.मारोडा, मा.पारडवार सर सावेला,मा. असेंडी मॅडम जि. प.मारोड,मा.पवन गुलाब माटे (अध्यक्ष आयकॉन बहुदेशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था )खोब्रागडे सर सि.वि. मारोडा, अरविंद मेश्राम सर,प्रकाश दरडे सर,शरद मडावी,बावणे सर,जनुभाऊ सोदिरवार, गावातील मारोडावाशीय प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी सर्वांनी उपस्थित राहून कोरोना विषयक जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.
आयकॉन बहुद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था
तुकुंम ता.नागभीड जिल्हा चंद्रपूर
9422806955,
9405145957