Top News

सावली तालुक्यातील लोंढोली जंगल परिसरात बिबट्याचा मृत्यू.

वन्यप्राण्यांच्या  झुंजी मध्ये बिबट्याचे मृत्यू? 

तालुक्यातील महिना भरात दुसरी घटना.
Bhairav Diwase.    Sep 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील अंतरगाव येथील नवभारत शाळेच्या परीसरात एक बिबट्याचा  पिलू मृत्यू अवस्थेत आढळला ही घटना महिना भरपुर्वी ची ताजी असताना आज पुन्हा सावली तालुक्यातील लोढोंली गावा मध्ये घडली. तालुक्यातील अनेक गाव चोहोबाजूंनी जंगल व्याप्त असल्यामुळे सध्या तालुक्यात अनेक गावाला वाघ व बिबट्या ची दहशत पसरलेली असून काही हिंस्त्र घटना सुधा घडले आहेत. व्याहाड बुज कापसी परिसरातील कापसी गावातील दहा वर्षीय मुलावर बिबट्या ने हमला करून त्याला ठार केल्यानंतर ची अंतरगाव ला बिबट्याचा मृतदेह आढळला हे सावरासावर होताच.

आज सकाळच्या व्याहाळ खुर्द उपवनपरी क्षेत्र शिरशी बीट कक्ष क्र 1534 लोढोंली  बस स्टँड कडून जाणारा पांदण रस्ता याला शेत शिवार व वन विभागाचा घेर असल्याने वन व्याप्त परिसर असल्यामुळे लोंढोली येथील कक्ष क्रमांक 15 34 व जवळ शेत शिवार सीमा असलेल्या या परिसरात बिबट्याचा मादी  मृतदेह आढळला  येथील ग्रामस्थांना माहीत होता बघणे साठी एकच गर्दी करण्यात आली सदर घटना सकाळच्या सुमारास असल्यामुळे सिरसी येथील वणरक्षक चौधरी यांना गावकऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर  वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली समस्त वनाधिकारी व चमू घटना स्थळी येऊन पंचनामा केला  यात बिबट्या मादी व वन्यप्राणी यांची झुंज झालेली समजले म्रूतू झालेल्या बिबट्या ला मानेला .पोटला .व दात आणि नख तुटले होते त्यमुळे म्रूतू झाले असे प्राथमिकता वरून सांगितल्या जात आहे. परीसरात  बिबट्या व वाघ यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  बिबट्याच्या व वाघ यांच्या घटनेत वाढ होतांना दिसतो आहे. बिबट्याचा  झुंजीत मृत्यू झाले असले तरी  बिबट्याच्या उतरनिय तपासणी अखेर माहिती होईल असे    विभागाकडून वर्तविले जात आहे वरील मृतक बिबट्याला पीएम करिता चंद्रपूर येथे नेण्यात आले.
मात्र कापशी  व्याहाड चा हिंस्त्रक बिबट्यांचा अजूनही शोध लागलेला नसल्यान नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे बिबट्या चा बंदोबस्त करावे. अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. सदर घटनेचा तपास  सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उपवनपरी क्षेत्र अधिकारी बुराडे व वनकर्मचारी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने