Top News

डॉक्टर एस. आर, रंगनाथन स्मृतीदिन साजरा.

Bhairav Diwase. Sep 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा 
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांचा स्मृतिदिन 27 सप्टेंबर 2020 रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विभागाद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर, प्राध्यापक संतोष कुमार शर्मा, प्राध्यापक सतीश पिसे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हुंगे सर यांनी डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थी प्राध्यापक व संशोधक त्यांच्या जीवनामध्ये ग्रंथालयाचे महत्व विशद केले. प्राध्यापक संतोष कुमार शर्मा सर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व पटवून देताना ग्रंथा सारखा दुसरा मित्र नाही आणि संशोधनाच्या कार्यामध्ये ग्रंथालयाचा कसा काय उपयोग होतो हे समजून सांगितले. प्राध्यापक सतीश पिसे यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन करताना शासनाच्या नियमाचे पालन करत फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून व मास्कचा वापर करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने