Top News

कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी २४ तासात पोलिसांच्या जाळ्यात, हत्येचं कारणही उघड.


Bhairav Diwase.      Sep 28, 2020
नागपुर:- कुख्यात गुंड बाल्या बिनेकर सिनेस्टाईल हत्याकांड प्रकरणात नागपूर पोलिसांनी २४ तासात मुख्य सूत्रधारासह इतर तीन आरोपींना अटक केली आहे.  जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याची कबुली आरोपीनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे (वय ३०), रजत राजा तांबे (वय २२), आसिम विजय लुडेरकर (वय २८)तिघेही राहणार इमामवाडा आणि भरत राजेंद्र पंडित (वय २२,इंदिरानगर, जाततरोडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिघांना रामटेक परिसरातून, तर एकाला नागपुरातून अटक केली आहे. अनिकेत उर्फ अभिषेक (रा. झिंगाबाई टाकळी), असे फरार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी चेतन हजारे याचे वडील सुनील हजारेचा २००१ मध्ये बाल्या बिनेकरने खून केला होता. त्यावेळी चेतन हा केवळ १५ वर्षाचा होता. काही वर्षातच चेतन हा गुन्हेगारी जगतात आला. त्याने जम बसविताच बाल्याचा खून करून बापाच्या हत्याकांडाचा बदला घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी तो गेल्या काही महिण्यापासून बाल्याची रेकी करीत होता. शेवटी त्याला संपविण्यासाठी शनिवार दिवस ठरविला. शनिवारी दुपारी चार वाजता भोले पेट्रोल पम्पजवळील सिग्नलवर
चेतनने आपल्या सहा साथीदारांसह बाल्याला अडविले. त्याच्यावर आरोपींनी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल
जाम झाल्याने गोळी चालली नाही. त्यामुळे घटनास्थळावर माऊजरची मॅगजीन पडली होती. आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून बाल्या बिनेकरचा सिनेस्टाईल खूनकरुन हे आरोपी फरार झाले होते. या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासात या हत्येचा उलगडा केला आणि आरोपींना अटक केली.

बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या:-

 बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाराजबाग रोडवरील बोले पेट्रोलपंपासमोर घडली.  हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे‌.
बाल्या बिनेकराचं नागपुरात सावजी भोजनालय आहे. त्याचबरोबर तो जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर काही हल्लेखोर पाळत ठेवून होते. शनिवारी दुपारी बाल्या हा काळ्या रंगाच्या कारने जात होता. हल्लेखोरांनी बाल्या बिनेकरच्या कारमागे बाईकने पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळ सिग्नल लागल्याने तो थांबवल्या याच वेळी मोपेड व बुलेटवर पाच जण आले. त्यांनी बाल्या याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी बाल्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बाल्या बिनेकरचा जागीच मृत्यू झाला होता.

नागपुरात याआधीदेखील अशाप्रकारचे घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नागपुरात एककीडे कोरोनाचा कहर असताना गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. याआधी ३ ते ४ जून दरम्यान २४ तासात तीन हत्येच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं.


बाल्या उर्फ किशोर बिनेकरची अंत्ययात्रा:- 

बाल्या उर्फ किशोर बिनेकरची अंत्ययात्रा काल संध्याकाळी त्याच्या शांतीनगर परिसरातील घरातून निघाली. कोरोना असतानाही हजारो लोक त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. अनेकांनी मास्कही लावले नव्हते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने