वि. प. आ फडणवीस- खा. राऊत भेटीनंतर रा. कॉं अध्यक्ष शरद पवार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीच्या चर्चांना उधाण.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 28, 2020

महाराष्ट्र:- राज्यात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या भेटीची चर्चा ताजी आहे. अशातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. तब्बल तासभर ही बैठक चालली. आता या भेटीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.

दरम्यान, वि. पण आ. फडणवीस- खा. राऊत भेटीनंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मात्र, वि. प. आ. फडणवीस- खा. राऊत यांच्या भेटीनंतर ही बैठक झाल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

२०१९मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा एकत्र लढूनही नंतर सत्ता वाटपावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये मतभेद झाले होते. दोन्ही पक्षात सत्ता वाटपाचं सूत्र जुळून आलं नाही. त्यामुळे शिवसेनेनने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हात मिळवत सत्ता स्थापन केली. या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष  शरद पवार व खा संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात (२६ सप्टेंबर) बैठक झाली.