सावली वनपरिक्षेत्रात बिबट्याची शिकार?

Bhairav Diwase
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील लोंढोली परिसरातील घटना.
Bhairav Diwase. Sep 28, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली वनपरिक्षेत्रातील व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील लोंढोली परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत असून, या मृत्यू पावलेल्या बिबट्याला ठार केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, मरण पावलेल्या बिबट्याच्या आजू- बाजूला रक्त ही पडलेले आहे.

या बिबट ला काही गंभीर दुखापत आहे. चमू घटना स्थळा कडे रवाना झालेली आहे. या संदर्भात वनविभागाची चमू तपास करणार आहे. आता जो बिबट मृत्यू पावला त्याच परिसरात गेल्या काही महिन्या अगोदर सुध्दा बिबट जाळी मध्ये अटकून मृत्यूमुखी पाडला होता. याच परिसरात मोठ्या प्रमाणात शिकारी चे प्रकरण ही समोर आलेले असून, काही जणांना अटकही करण्यात आलेली होती. मात्र बिबट्याचा मृत्यू कशााने झाला? हे शवविच्छेदनानंतर नेमका प्रकार करणार आहे हे समजणार आहे.