ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- गोसीखुर्द धारणाच्या पावसामुळे वैनगंगा नदीला आलेल्या महापुराने ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, बेलगाव,कोलारी,पिंपळगाव ह्या गावामध्ये पुराचे पाणी आल्याने ह्या गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले त्यामुळे गावातील नागरिकांना ब्रम्हपुरी येथे स्थलांतरित करण्यात आले.ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारनी महाविद्यालय,शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

   या सर्व गावांतील १५०० ते२००० नागरीकांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचेकडून भोजनाची व्यवस्था पुरविली जात आहे.संपूर्ण नागरीकांची आरोग्य तपासणी,सर्व नागरीकांना ताट, वाटी,ग्लास,ताळपत्री, ब्लँकेट ,मास्क अशा प्रकारचे सर्व जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.अचानक आलेल्या संकटाने सर्वांना सध्या बेघर केले आहे मात्र चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया हे संकटात धावून आल्याने सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

 ब्रम्हपुरी येथे भोजन व जीवनावश्यक साहित्य वाटप करतांना जिल्हा परिषद सदस्य क्रीष्णाभाऊ सहारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेशभाऊ पठाण,भाजपा जेष्ठ नेते राजूभाऊ देवतळे, कृ. ऊ. बा.उपसभापती गणेशभाऊ तर्वेकर बांधकाम सभापती सचीनभाऊ आकुलवार,नगरसेवक सिरिषभाऊ वानखेडे,अरविंद राऊत उपस्थित होते.