पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व गोरगरीब, वंचित, दलित, आदिवासी व शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात "सेवा सप्ताह" म्हणून साजरा करण्यात येत आहे.
केमारा देवाडा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री कोडापे सर, ग्रामसेवक श्री कंबलवार साहेब, श्री लक्ष्मण गव्हारे, श्री यशवंत ढोंगे, संतोष बोलमवार व गावातील पालक वर्ग उपस्थित होते.