Bhairav Diwase. Sep 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांचे अधिपत्याखालील विजाभज आश्रम शाळांचे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात संस्थेने निवासी विद्यार्थ्यांसाठी परिपोषण व इतर बाबींवर केलेला खर्च नियमाप्रमाणे मार्च २०२० मध्ये मंजूर करणे आवश्यक होते. परंतु निधीअभावी ४०% अनुदान आद्यपपावेतो विभागाकडून मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे संदर्भीय निवेदनाद्वारे २१/०९/२०२० पर्यन्त थकीत अनुदान प्राप्त न झाल्यास दिनांक २२/०९/२०२० पासुन धरणे। आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी दिलेला आहे.
सदर निवेदनाची व आमच्या मागण्याची दखल शासनाकडून घेण्यात आली नसल्यामुळे दिनांक ०९/०९/२०२० चे। नेवेदनानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संस्था चालक अडचणीकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २२/०९/२०२० पासून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालया। समोर सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या। वेळेत एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत.
सदर आश्रम शाळा सुरळितपणे चालविण्यासाठी संस्था चालकांनी तात्पुरतं कर्ज घेऊन निवासी विद्यार्थ्यांचे परिपोषनावर खर्च केलेला आहे . तथापि अद्यपपावतो विभागाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे अशा व्यक्ती संस्थेकडे कर्जाची रक्कम परत करण्याबाबत सारखा तगादा लावीत आहेत. तेव्हा सन २०१९-२०२० या वर्षातील आश्रम शाळेचे थकीत असलेले ४०% वेतन त्वरीत अदा करण्यात यावी तसेच सन २०२०-२०२१ या वर्षाकरीता पूर्व तयारी साठी लागणारे ६०% अनुदान सुद्धा त्वरित वितरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन देतांना सौ. संध्या गुरनुले, श्री तुकाराम पवार, पंचफुला जाधव, प्रशांत चटप, मनोहर चटप, हरिशचंद्र राठोड, प्रकाश जाधव, राजेश मून, नंदलाल चटप, सिंघलबाई राठोड, रामराव पवार इत्यादी उपस्थित होते.