आरोपीस अटक, राजुरा पोलिसांची कारवाई, राजुरा मार्गावर तस्करीत वाढ.
Bhairav Diwase. Sep 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- लक्कडकोट मार्गे तेलंगणा मार्गाने जाणाऱ्या ट्रक कमांक एम.एच.४० बीएल ६१८२ यास आज ११ वाजता सुमारास थांबवुन तपासणी केली असता १०,००,००० रू. किमतीचे १० टन जनावरांचे मांस, १५,००,००० रू. किमतीचा ट्रक असा एकुण २५,००,०००रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी नौशाद अहमद कुरेशी (४५) रा. माजीमंडी, कामठी जि.नागपूर, राजु पंडरी चहांदे (४८) रा.बाळेघाट,ता. पारशिवनी जि.नागपूर यांना अटक करण्यात आली. सदरची कारवाई नरेंद्र कोसुरकर पोलीस निरिक्षक, प्रशांत साखरे सहा. पोलीस निरिक्षक, हवालदार लोखंडे, पोलीस शिपाई संपत पुलीपाका, पोलीस शिपाई प्रविण डवरे यांनी केली.