गावातील प्रत्येक मातेने अंगणवाडीतील पोषण आहार आपल्या बाळाला द्या श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच कन्हाळगाव यांचे आव्हान.
Bhairav Diwase. Sep 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- कन्हाळगाव येथील अगंनवाडी क्र 2 मध्ये पोशन अभियान जन आदोंलन कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपणा तथा उपसरपंच कन्हाळगाव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुण पुष्प अर्पण करुण अभिवादन केले या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा उप सरपंच कन्हाळगाव होते प्रमुख पाहुणे श्री मधुकर वाबीटकर सौ मंदाताई टेकाम सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात पोषण आहार हा प्रत्येक मातेने आपल्या मुलाला द्यावा व आपला मुलगा कसा सुदृढ होईल याची जबाबदारी घ्यावी बाळाला अंगणवाडी सेविका मदत करत असते परंतु मातेची सुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे मातेने सुद्धा आपली जबाबदारी पार पाडावी असे बोलून दाखवले कार्यक्रमाचे संचालन मंदाताई टेकाम यांनी केले तर आभार सौ खडसे ताई यांनी मानले कार्यक्रमाला महिला व बाळ गोपाळ उपस्थित होते