Click Here...👇👇👇

कोरपना तालुक्यात एमआयडीसी स्थापना करावी, सुशिक्षित बेरोजगारांची मागणी.

Bhairav Diwase
परिसराच्या विकासाला मिळेल चालना.
Bhairav Diwase. Sep 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्व दूर ओळख आहे. मात्र गडचांदूर, नांदा , नारंडा, सोनुर्ली, विरूर वगळता कोरपना, पारडी , परसोडा कोडशी भागात उद्योगधंदेच नसल्याने परिसरातील अनेक सुशिक्षित बेरोजगार पडले आहे. त्यामुळे या क्षेत्रात एमआयडीसीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारा कडून होत आहे.
तालुक्यात चार सिमेंट उद्योग, एक कोळसा खाण ,दहा जिनिंग प्रेसिंग कारखाने आहे. मात्र येथील उद्योगात स्थानिक पेक्षा परप्रांतीय कामगाराचाच अधिक भरणा झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कामाच्या संधी सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध नाही. कोरपना भागात शासनाने एमआयडीसी उभारल्यास येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताला काम मिळेल. तसेच रोजगाराच्या संधी प्राप्त होईल. पर्यायाने या भागाचा विकास होऊन बाजारपेठेला चालना मिळेल. या अनुषंगाने परिसरातील जेवरा, मांडवा , चोपण येथे मुबलक जागाही उपलब्ध आहे. त्यादृष्टीने शासनाने सकारात्मक हालचाली करून एम आय डी सी स्थापन करावी अशी अपेक्षा सुशिक्षित बेरोजगार व्यक्त होत आहे.